Corona Warriors | कोरोनाच्या संकटातील सारथी, ओलाचालक विद्या शेळके यांची जिगरबाज कहाणी

हातात स्टेरिंग आणि मनात जिद्द बाळगून मुलुंडची विद्या शेळके महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर वा-याच्या वेगाने आपली कार घेऊन धावत आहे. ध्येय एकच लॉकडाऊनच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या महिला, वृद्ध आणि विकलांग लोकांना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्याचं. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात महाराष्ट्रावर आलेल्या संकटात आपलही काही योगदान असावं. या हेतूने विद्या सेवा देत आहे. ज्यांना मदतीची गरज आहे, अशांसाठी विद्या फेसबुक, टिकटॉक आणि अन्य सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करते. त्या माध्यमातून अनेकांनी विद्याशी संपर्क साधून मदत मागितली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola