Obc Reservations : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार,राज्य सरकाराची मागणी आयोगानं फेटाळली : Abp Majha

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं. त्यामुळं २१ डिसेंबरला होणाऱ्या १०५ नगरपंचायतीच्या निवडणुकांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र स्थगित २७ टक्के ओबीसी जागांवरील निवडणुका वगळता उर्वरित जागांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. या स्थगित केलेल्या २७ टक्के जागा खुल्या प्रवर्गात निवडणूक आयोग वर्ग करणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर या २७ टक्के जागांसाठी जानेवारीत निवडणूक होणार असल्याचं समजतंय. ओबीसी जागांवरील नवीन निवडणूक कार्यक्रम लवकरच निवडणूक आयोग जारी करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. परंतु दोन्ही निवडणुकांची मतमोजणी मात्र एकाच दिवशी होणार असल्याचं समजतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram