OBC Reservation :ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिलीय : ABP Majha

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिलीय. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय विधिमंडळात सर्वानुमते घेण्यात आला. या विधेयकावर कालपर्यंत सही झाली नव्हती. त्यामुळे सत्ताधारी आघाडीचे नेते काल संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार होते. पण तत्पूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधेयकावर स्वाक्षरी केली आणि विधेयकाचा मार्ग मोकळा झाला. हा कायदा निवडणूक आयोगाला मान्य करावा लागेल असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. आता निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर ८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोग जो डेटा सादर करेल तो सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का हादेखिल महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola