OBC Protest | आरक्षण बचाववासाठी ओबीसींचा मोर्चा, बुलढाणा, जालना जिल्ह्यात आंदोलन
आरक्षण बचावच्या मागणीसाटी ओबीसींच्या विविध संघटनांकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. ओबीसिंच्या 27 टक्के आरक्षणात कुठलाही बदल करू नये ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी आरक्षण बचाओ मोर्चा काढण्यात आला, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि अंबड तालुका संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.