8 ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन करणार, ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचा ओबीसी नेत्यांचा इशारा
मराठा समाजाला इडब्ल्यूस प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरूपात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची हालचाल सुरू होती. याला मराठा समाजाचा विरोध होता. त्यामुळे हे आरक्षण आम्हांला नको या मागणीसह आज छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. भेटीत संभाजी राजेंची मागणी ऐकून घेतल्या नंतर आपण लवकरच यावर स्थगिती आणू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संभाजी राजेंनी दिली. याबाबत बोलताना संभाजी राजे म्हणाले की, बैठकीत इडब्ल्युएस आरक्षणाबाबत आमची चर्चा झाली आहे. इडब्ल्यूएसच्या 10 टक्क्यांच्या आरक्षणाला सर्व समाजाचा विरोध होता. कारण मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास ठरवलं आहे. त्याबाबत कायदा देखील झाला आहे.