Nurses Protest | राज्यभरात परिचारिकांकडून आंदोलनं,मागण्या मान्य न झाल्यास 8 तारखेपासून कामबंद आंदोलन
Continues below advertisement
राज्यभरातील परिचारिकांनी 1 सप्टेंबर पासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 8 तारखेपासून एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहोंत. या दिवशी जी रुग्णालयामध्ये समस्या निर्माण होईल याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता गाजबे यांनी म्हंटल आहे. राज्यात परिचारिकांची तब्बल 70 ते 80 हजार संख्या आहेत. या सर्वांनी 1 तारखेपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
Continues below advertisement