पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला जप्तीची नोटीस, थकीत 1 कोटी 86 लाखांचा कर भरण्याचे आदेश

Continues below advertisement

मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंचवड मनपाने मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी उभ्या केलेल्या गुरुकुलम या संस्थेचा एक कोटी 86 लाखांचा कर थकल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. गिरीश प्रभुणे यांना नुकतंच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

एका हातात सन्मान आणि दुसऱ्या हातात जप्तीची नोटीस अशा काहीशा अवस्थेला गिरीश प्रभुणे यांना सामोरं जावं लागतंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती आता भाजपची सत्ता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram