Noida : नोएडामधील माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरातील तळघरात साडेसहाशे लॉकर्समध्ये कोट्यवधीची काळी माया : ABP Majha

Continues below advertisement

नोएडामधील माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरातील तळघरात साडेसहाशे लॉकर्समध्ये कोट्यवधीची काळी माया आढळलीय. माजी सनदी अधिकारी आर.एन.सिंह यांच्या घरावर गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. यात कोट्यवधींची रक्कम सापडलीय. सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. आयकर विभागाने तळघरात तपासणी केली असता या लॉकरमध्ये कोट्यवधींची रक्कम आणि दागिने सापडलेत. ही रोकड आणि दागिने कुणाचे आहेत याबाबतची माहिती मिळालेली नाही. आर.एन.सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. त्यामुळे या लॉकरशी आपला संबंध नसल्याचा दावा आर.एन.सिंह यांनी केलाय. छापेमारीत सापडलेली सर्व संपत्ती जप्त करणार असल्याची घोषणा कालच्या अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यामुळे आर.एन.सिंह यांच्या घरात सापडलेली ही काळी माया जप्त करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram