Mumbai #Corona कोरोना वाढत असूनही मुंबईकरांची बेफिकिरी, महापालिकेकडून धडक कारवाई
मुंबईत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेनं पब आणि बारवर धाडसत्र सुरु केलंय. याशिवाय मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि लग्नाच्या हॉलवरही महापालिकेच्या पथकानं छापेमारी केली. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात येत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडही आकारण्यात आला.