Mumbai | नाताळ आणि नव्या वर्षासाठी कोणत्याही गाईडलान्स नाहीत, पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

Continues below advertisement
नाताळ, नववर्षासाठी महापालिकेकडून उद्या नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत हॉटेल्स आणि नववर्ष जल्लोषासाठी रात्री उशिरापर्यंत परवानगी मिळणार का याची उत्सुकता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सगळ्या सणांवर निर्बंध घालण्यात आले. अजूनही कोरोनाचा धोका कायम असल्यानं नाताळ आणि नववर्ष जल्लोष करताना निर्बंध किती शिथिल केले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईत हॉटेल्स ११.३० वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र हॉटेल आणि बार चालकांनी रात्री दीड वाजेपर्यंत १०० टक्के क्षमतेनं हॉटेल्स, बार सुरु ठेवण्याची परवानगी मागितली आहे. महापालिका आजपर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नियमावली तयार करणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram