Ganeshotsav 2020 | कोकणात गणेशोत्सवासाठी एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही,या संकेतस्थळावर करा बुकींग

Continues below advertisement

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी उद्या 5 ऑगस्टपासून एसटी बसेस नेहमीच्या बसस्थानकातून  सोडण्यात येणार आहेत. त्यांचे प्रचलित तिकीट दरात, आगाऊ आरक्षण आज मंगळवार 4 ऑगस्ट मध्य रात्रीपासून  सुरू होत असल्याची माहिती परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष  अ‍ॅडव्होकेट अनिल परब यांनी दिली. अ‍ॅडव्होकेट अनिल परब  म्हणाले की, करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासात सामाजिक अंतर राखून एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी घेऊन एसटी बसेस उद्या बुधवार  5 ऑगस्टपासून 12 ऑगस्टपर्यंत सोडण्यात येत आहे . या बसेसचे आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे ) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. तसेच, सदर बसेस ह्या विनाथांबा असल्याने (नैसर्गिक विधी वगळून)शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त  कुठेही थांबणार नाहीत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram