Ganeshotsav 2020| देखावे बनवणाऱ्या कलाकारांचे हात यंदा रिकामे,गणेश मंडळांकडून देखाव्यांना मागणी नाही

दरवर्षी गणेश मंडळंमध्ये देखाव्यांसाठी स्पर्धा रंगलेली असते, जनजागृतीपर म्हणा किंवा सामाजिक संदेश दाखवण्याचा यातून प्रयत्न केला जात असतो. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे आणि याचा परिणाम छोट्या मोठ्या कलाकारांवरदेखील झालेला बघायला मिळतोय. नाशिकचा प्रसिद्ध कलाकार वरूण भोईर याच्याकडे दरवर्षी नाशिकसह गुजरात, नंदुरबार तसेच धुळ्याच्या 25 ते 30 मंडळांचे देखावे साकारले जातात, गणेशोत्सवाच्या अडीच महिने आधीपासूनच त्याच्याकडे कामाची लगबग सुरु होत असते मात्र यंदा एकाही मंडळांचं बुकिंग त्याच्याकडे आलेलं नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola