#Corona बुधवार पेठेत कोरोनाचा शिरकाव नाही, एकही कोरोना रुग्ण नसलेला झोन | स्पेशल रिपोर्ट
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गहिरं होत असतानाच अतिशय गजबजलेल्या समजल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतल्या रेड लाईट एरियात मात्र कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप तरी सापडला नाही. लॉकडाऊन लागू झाल्यापासून या रेड लाईट एरिया मध्ये ग्राहकाचं येणे कमी झालं. या परिसरात जाणारे सर्व रस्ते पत्रे आणि काठ्या लावून बंदही करण्यात आले होते. या परिसरात राहणाऱ्या देवदासीनीही कोरोनाच्या अनुषंगानं घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं आणि काही सामाजिक संस्थांनी ही वेळोवेळी येथील महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रबोधन केलं या कठीण काळात कसं जगता येईल येईल याविषयी मार्गदर्शन केलं. त्यामुळेच कोरोना या भागात शिरकाव करू शकला नाही असं म्हणता येईल.