नंदुरबारमध्ये बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी होत नसल्याचं समोर,कोणत्याही तपासाशिवाय राज्यात प्रवेश
Continues below advertisement
गुजरातमधून आलेल्या नागरिकांची जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी होणार असल्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. सरकारच्या या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील आठ रस्त्यांवर चेक पोस्ट तर नंदुरबारच्याही प्रमुख मार्गवर चेकपोस्ट उभारले जाणार असल्याची माहिती होती, कोरोना तपासणी नसेल तर वाहनचालक माघारी पाठवलं जाणार असल्याचं ठरलं होतं, मात्र नंदुरबारमध्ये कोणत्याची प्रकारची तपासणी होत नसल्याचं समोर आलंय.
Continues below advertisement