Mantralaya | जनतेसाठी खडखडाट मात्र ऊर्जामंत्र्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण जोरात,वीजबिलात सवलत नाहीच
सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं जनतेला वीजबिलात सवलत देण्यास असमर्थ ठरलेल्या सरकारनं मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावर मात्र खर्च सुरुच ठेवलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाचंही नुतनीकरण सुरू आहे, त्यामुळे सरकारी तिजोरीत जनतेसाठी खडखडाट असला तरी मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयावर मात्र होऊ दे खर्च असं राज्य सरकारचं धोरण असल्याचं दिसून येतंय.