Nitin Choughule | नितीन चौगुलेंनी केली नव्या संघटनेची घोषणा, भिडे गुरुजींना मोठा धक्का
भिडे गुरूजींकडून काही धारकरी अवैध कामे करून घेतात असा गंभीर आरोप नितीन चौगुले यांनी केला आहे. यावर चौगुले म्हणाले, काही वाळू तस्कर, तडीपार झालेले, लॉटरीवाले असे काही लोक गुरूजींना घेऊन काही अधिकाऱ्यांकडे आणि राजकीय लोकांकडे फिरत असतात आणि त्यांच्याकडून अवैध कामे मंजूर करून घेतात.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये अखेर फूट पडली आहे. काही दिवसांपूर्वी कार्यवाहक पदावरून हटवलेल्या नितीन चौगुले यांनी अखेर आपली वेगळी संस्था काढली आहे. राज्यातल्या शेकडो धारकऱ्याच्या उपस्थितीमध्ये शिवभक्ताचा मेळावा घेत 'श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान संस्था' ची घोषणा केली आहे. या संस्थेची स्थापना करत असल्याची घोषणा करत संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान समोर एक आव्हान उभा केले आहे.