Nirahua Challenge | Rohit Pawar यांचा 'त्या' Bhojpuri अॅक्टरला थेट आव्हान, सुरक्षेवरून सवाल
Continues below advertisement
दरम्यान, निरहुआ यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी त्या भोजपुरी कलाकाराला आणि नेत्याला आव्हान स्वीकारले आहे. 'एकदा महाराष्ट्रात येऊन दाखवा तुमचं काय होतं?' असे थेट आव्हान रोहित पवार यांनी दिले आहे. त्या भोजपुरी अॅक्टरच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारने घ्यावी, असेही रोहित पवार म्हणाले. तुम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची सुरक्षा घेऊ शकत नाही, पण या भोजपुरी अॅक्टरची सुरक्षा फक्त तुमचा पदाधिकारी म्हणून घेऊन तुम्ही दाखवावी, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भोजपुरी कलाकाराच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement