Corona | नाशिकमध्ये रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी, पालकमंत्री छगन भुजबळ यांची माहिती

नाशिक शहरात सोमवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यात मात्र कोणतीही संचारबंदी नसणार आहे. नाशिक शहरात झपाट्यानं रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली. तसेच मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असंही छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola