Maharashtra Politics | संजय राऊत उद्धव ठाकरेंना अडचणीत आणतात : तरुण भारत | ABP Majha
सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराच्या तरुण भारत या वृत्तपत्राने शिवसेना प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे. राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून जर नागपूरचा 93 वर्षांची परंपरा लाभलेला तरुण भारत माहित नसेल तर ही बौद्धिक दिवाळखोरी आहे, असे म्हणत राऊतांना लक्ष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तरुण भारतने संजय राऊतांवर टीका करत असताना उद्धव ठाकरेंवर मात्र अजिबाद टीका केलेली नाही.