Special Report | राफेल प्रकरणातील सर्व फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या | ABP Majha
Continues below advertisement
राफेल डीलच्या तपासासाठी दाखल सर्व फेरविचार सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. तसंच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची माफीही स्वीकारली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला क्लीनचिट देताना, राफेल सौद्याचा वेगळा तपास करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. प्रकरणाची मेरिट पाहता पुन्हा तपासाचा आदेश देण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं. तर राहुल गांधींविरोधातील अवमानना याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती संजय किशन कौल म्हणाले की, "एफआयआर किंवा तपासाची गरज नाही. आमच्यासमोर बिनशर्त माफी ठेवण्यात आली आणि आम्ही ती स्वीकारतो."
Continues below advertisement