VIDEO | झाडावरुन उडी मारत बिबट्याची गावकऱ्यांना हुलकावणी | ABP Majha
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळे गावात काल रात्री बिबट्या शिरला. एका मुलाला हा बिबट्या दिसताच त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे गांगरलेला बिबट्या शेजारच्या उंच झाडावर चढून बसला. रात्री दोनपासून ग्रामस्थांनी या झाडाला वेढा घातला. वनविभागाचं पथक येईलपर्यंत ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर पोकलेन मशीनवर बसून बिबट्याला बंदुकीच्या सहाय्याने बेशुद्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले. बिबट्याला पकडण्यासाठी ग्रामस्थ जाळी घेऊन झाडाखाली सज्ज होते. मात्र बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच बिबट्याने झाडावरून खाली उडी मारली आणि जाळीला हुलकावणी देत धूम ठोकली.