Uddhav Thackeray | शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी मला अमित शाह-फडणवीसांच्या मदतीची गरज नाही : उद्धव ठाकरे | ABP Majha

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कितीही खोटारडेपणाचे आरोप केले तरी जनतेला सगळं माहित आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही ओळख मी जाऊ देणार नाही. बाळासाहेबांच्या मुलावर पहिल्यांदा कोणीतरी खोटेपणाचे आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola