Girgaon Parbodhan | रायगड, प्रतापगडसह विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती, गिरगाव प्रबोधनतर्फे किल्ले स्पर्धेचं आयोजन | ABP Majha

गिरगाव प्रबोधन आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेत फोटो फेस्ट, व्यंगचित्र स्पर्धा आणि विविध प्रदर्शनं आयोजित करण्यात आली. शारदासदन शाळेत या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. किल्ले स्पर्धेचं हे पाचवं वर्ष आहे. मुंबईसह परिसरातील किल्लेप्रेमींनी याला उत्तम प्रतिसाद दिला. लहान मुलांच्या तब्बल आठ प्रवेशिका या स्पर्धेसाठी आल्या. छायाचित्रांसाठी भारतातील सण आणि उत्सव ही प्रमुख संकल्पना होती. महाराष्ट्रभरातून या छायाचित्रांसाठी प्रवेशिका आल्या. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola