Uddhav Thackeray at Gopinath Gad | गोपीनाथ गडावरुन कमळ आणि धनुष्य एकत्र होणार? | परळी | ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीचा तिढा सुटत नाहीए... पण तिकडे बीडमधील गोपीनाथ गडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनोख्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपच्या बोधचिन्हांची फुलांची रांगोळी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी काढण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे सत्तास्थापनेचा आणि चर्चेचा तिढा कायम आहे, तर तिकडे रांगोळीतून मात्र सूचक भूमिका मांडल्याचं चित्र आहे. तरी, उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या नुकसान पाहणी दौर्यावर आहे. त्यावेळी ते गोपीनाथगडावर जाऊन दर्शन घेणार आहेत.
Continues below advertisement