Ayodhya Verdict | अयोध्या निकालामुळे उत्तर प्रदेशातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, योगी आदित्यनाथांचे आजचे कार्यक्रम रद्द
अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत छावणीचं स्वरुप आलं आहे. अयोध्येतल्या सगळ्याच रस्त्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी मोर्चा सांभाळलाय. राममंदिर परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असून जमिनीपासून आसमंतापर्यंत अयोध्येत घडणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. मुंबईतही ठिकठिकाणी सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात आला आहे.