New Year Rule : 31 डिसेंबरला जल्लोष करा पण नियम पाळून - राज्य सरकार : ABP Majha
सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषात करण्याची परंपराच बनली आहे. मात्र, आधीच असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात ओमायक्रॉनचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने नागरिकांच्या उत्साहाला थोडीशी वेसण घालणारा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु लावला आहे. त्यामुळे यंदाचा नववर्ष साजरे कसे करावे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्या संदर्भात आता राज्याच्या गृहखात्यानं एक नियमावली जाहीर केली आहे. त्यात सर्व नियम देण्यात आले असून नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे असे आवाहन करण्यात आले आहेत
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Government महाराष्ट्र December ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News