Amravati Corona | अमरावती जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट, 24 तासात 1055 नवे रुग्ण, मुंबईला टाकलं मागे

अमरावतीत काल रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. हा 36 तासांचा लॉकडाऊन सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत असणार आहे. या आदेशातून सर्व औषधे विक्री दुकाने, रुग्णालये, प्रसृतीगृहे, दवाखाने, वैद्यक प्रयोगशाळा, रुग्णवाहिका या सेवांना वगळण्यात आलंय.  दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी कोरोनाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola