
State Cabinet : शिंदे -भाजपमधल्या वाटाघाटीमुळे विस्तार रखडला? : ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा दिल्लीवारी करणार आहेत. पुढे दोन दिवस शिंदे आणि फडणवीस दिल्लीत आहेत. दोन दिवसांत दोन सरकारी बैठकांना उपस्थिती हा प्रमुख अजेंडा असला तरी या दौऱ्यात नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत. भाजपची यादी निश्चित झाली असून दिल्ली दौऱ्यात त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आहे.
Continues below advertisement