Sharad Pawar | आम्हाला राजकारण करण्यात रस नाही, मराठा समाजाला न्याय द्यायचाय - शरद पवार
मराठा आरक्षण स्थगितीविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येऊ शकते. विरोधकांना राजकारण करायचं आहे, आम्हाला मराठा सामाजाला न्याय मिळवून द्यायचं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणाले. हे आरक्षण टिकेल कसं आणि मुलांना न्याय कसा मिळेल असा आमचा प्रयत्न आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.