Sharad Pawar Uncut LIVE | ...तर सैन्य बोलावणं हा शेवटचा पर्याय : शरद पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम पुढे घेता येईल का, याचा जाणकारांनी विचार करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामनवमीनिमित्त गीत रामायणाच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही भाष्य केलं.