Samir Khan Drug Arrest | कायदा आपलं काम करेल आणि योग्य न्याय होईल, जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांचं ट्वीट

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक करण्यात आली आहे. उद्या सकाळी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती आहे. ड्रग्स कनेक्शनमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. आरोपी करण सजनानीच्या चौकशीत नाव आल्याने समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते. सकाळी 10 पासून समीर खान यांची चौकशी सुरू होती. दहा तासाहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान समीर खान यांच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची तातडीनं मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola