Navneet Kaur Rana | या निर्णयात शरद पवार सामील : खासदार नवनीत कौर राणा | ABP Majha
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सभागृहामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित यायला हवं, असं म्हटलं होतं. आज भाजप आणि अजित पवारांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. या घडामोडीनंतर एबीपी माझाशी बोलताना खासदार नवनीत कौर राणा म्हणाल्या की, राज्याच्या लोकांना कसा न्याय द्यायला पाहिजे हे पवारांनी नेहमी समोर ठेवलं आहे. काही बोलणी सुरू होती. त्यामुळेच मी हा ठामपणे हा विषय सभागृहात मांडला होता. गद्दारी भाजपने नाही तर शिवसेनेने केली आहे. मला वाटतं या निर्णयात शरद पवार सामील आहेत, असे राणा यांनी म्हटले आहे.
Tags :
President Rule Navneet Kaur Rana Uddhav Thackeray BJP Sharad Pawar Ajit Pawar Devendra Fadnavis Ncp Shiv Sena Maharashtra Congress