Panvel मधील वसतिगृहांच्या दुरवस्थेची उच्चस्तरीय चौकशीची युवासेनेची मागणी : ABP Majha
पनवेलच्या आयटीआय वसतिगृहाची दुरवस्था माझाने दाखवल्यानंतर विद्यार्थी संघटनांनीही त्याची दखल घेतलीय. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केलीय. या मुद्यावर युवासेनेचं शिष्टमंडळ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं