Baba Maharaj Satarkar : बाबामहाराज सातारकर यांना अखेरचा निरोप Neral Navi Mumbai
abp majha web team
Updated at:
27 Oct 2023 05:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अमोघ, गोड आणि मधूर वाणीने, कीर्तनाला नवा आयाम देणारे ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी भूमंडळाचा निरोप घेतलाय. सध्या त्यांच्यावर नवी मुंबईतील नेरूळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतायत.. बाबामहाराज सातारकर यांनी कीर्तनसेवेतून महाराष्ट्रभर सात्विक विचारांची आणि अध्यात्मिक मूल्यांची पेरणी केली. त्यामुळे, विठ्ठलाचा हा भक्त वैकुंठात गेला तरी, तिथेही आपल्या कीर्तनरंगाने अवघा स्वर्ग विठ्ठलमय करेल, टाळ-मृदंगाचा गजर होईल आणि तिथंही राम कृष्ण हरीचा जयघोष होईल, अशी भावना व्यक्त केली जातेय.