Vashi APMC : वाशी एपीएमसी मार्केट मध्ये संत्र्याची आवक वाढली
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्यांची आवक वाढलीय. बाजार समितीत दिवसाला संत्र्याच्या जवळपास ४० गाड्यांची आवक होत आहे. यापैकी ६० टक्के आवक ही नागपूरमधून होत असून अहमदनगर आणि राजस्थानातूनही संत्र्यांची मोठी आवक होतीय. ग्राहक मात्र नागपूरच्या संत्र्यांना पसंती देताना दिसतायत. नवी मंबई एपीएमसी मार्केटमध्ये संत्र्याला किलोमागे सध्या ३५ ते ५० रुपयांचा दर आहे. येत्या काही दिवसांत ही आवक आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी...