Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी

Continues below advertisement

Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी
ठाणे लोकसभा जागेवर शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर होताच मिरा भाईंदरमध्ये भाजपा पदाधिका-यांचे राजीनामा सञ सुरु झाले आहे. नवी मुंबईपाठोपाठ मिरा भाईंदरमध्येही नाराजीनाट्य सुरू आहे. भाजपाचे मिरा भाईंदर शहर जिल्हाचे महासचिव ध्रुवकिशोर पाटील, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज खातिब आणि भाजपाचे मिरा भाईंदरचे युवाचे महासचिव विशाल पाटील, मिरा भाईंदरचे भाजपा प्रवक्ते निरज उपाध्ये यांनी राजीनामा दिल्याची माहिती भाजपाचे महासचीव ध्रुवकिशोर पाटील यांनी दिली आहे. ठाणे लोकसभेत सर्वाधिक आमदार आणि प्रमुख तीनपैकी दोन पालिकांवर भाजपाची सत्ता असल्याचा दाखला देत ही जागा भाजपाने लढवण्याचा आग्रह मिरा भाईंदरच्या भाजपा कार्यकर्त्यांनी धरला होता. बुधवारी महायुतीकडून शिवसेनेचे नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram