Swachh Sarvekshan 2020 | देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या स्थानी, इंदूर पुन्हा अव्वल

Continues below advertisement
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर गुजरातमधील सूरत शहर आहे. स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या कॅटगरीमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूरची निवड करण्यात आली आहे. तर दुसऱ्या स्थानी गुजरातमधील सूरत शहराची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण 2020'मध्ये परिणामांची घोषणा केली. या दरम्यान स्वच्छतेसाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या शहरांचाही गौरव करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram