
Navi Mumbai Metro :नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर,पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख
Continues below advertisement
येत्या ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारं नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे राज्य शासनासह सिडको आणि जिल्हाधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत.
Continues below advertisement