Neral - Matheran : नेरळ माथेरान मिनिट्रेन लवकरच रुळावर , शटल सेवेला जोडणार दोन जादा बोगी
माथेरान ते नेरळ ही मिनीट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत रुळावर येण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता, तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरू होती. सध्या रेल्वे रुळ बदलण्याचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी आणि विभागीय प्रबंधक सलग गोयल यांनी पाहणी केलीय.