Navi Mumbai : मृतदेहाच्या चपलेवरुन लावला आरोपीचा शोध, दोन जणांना अटक ABP Majha

Continues below advertisement

पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आलेय. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. अज्ञात मृतदेह असल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती अखेर मयत व्यक्तीने घातलेली नवीन ब्रँडेड चप्पल कुठे भेटते या दुकानाची माहिती काढून त्या दुकानाचे सिसिटीव्ही तपासले असता आरोपी हा बॉडी बिल्डर असल्याचे निदर्शनास आले. यावरून सर्व जिममध्ये माहिती घेतली असता घणसोली येथील एका जिम मध्ये आरोपी ट्रेनर म्हणून काम करत असल्याचे समोर आले तसेच आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या साथीदाराचा देखील सुगावा लागला. मुख्य आरोपी रियाज खान आणि सह आरोपी इम्रान शेख याच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत मयत महिलेचे नाव उर्वशी वैष्णव असे असून ती नेरुळ येथील एका बार मध्ये कामाला होती. तिचे मुख्य आरोपी रियाज खान सोबत प्रेम संबंध सुरु होते. उर्वशी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने तिची रियाजने आपला साथीदार इम्रानच्या सहकार्याने रशीने गळा आवळून उर्वशीची हत्या करुन मृतदेह धामणी गावाजवळील उड्डाणपूलाखाली फेकून दिला असल्याची माहिती दिली. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram