Navi Mumbai Crime : गस्पेल चर्चमध्ये आणखी 3 मुलींवर लैंगिक अत्याचार? नवी मुंबईतील सीवूड येथील प्रकार

Continues below advertisement

नवी मुंबईतील सीवूड येथील बेथेल गस्पेल चर्चमध्ये आणखी 3  मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेय. या चर्चमध्ये असलेल्या अनधिकृत आश्रम शाळेवर महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी धाड टाकत इथून 45 मुलामुलींची सुटका केली होती. यापैकी तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी मागील महिन्यातच पास्टर राजकुमार येसुदासन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता... यानंतर आता महिला व बालविकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मुलांचं काऊन्सलिंग केल्यावर आणखी तीन मुलींनी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलंय... त्यामुळे यासंदर्भात महिला व बालविकास विभागानं या संदर्भात तक्रार दाखल केलीय... एनआरआय पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पास्टर येसुदासन यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram