Onion export Duty: शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद होण्याची शक्यता ?

Continues below advertisement

Onion export Duty: शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी नवी मुंबई एपीएमसी मार्केट बंद होण्याची शक्यता ? कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्यात आल्याने याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. यामुळे नाशिक मधील शेतकर्यांनी कांदा विक्री बंद केली आहे. शेतकरी वर्गाला पाठिंबा देण्यासाठी आता नवी मुंबई एपीएमसी मधील  कांदा बटाटा मार्केट बंद होण्याची शक्यता आहे. वाशीतील कांदा बटाटा मार्केट बंद झाल्यास याचा परिणाम शहरवासीयांवर होणार आहे. आधीच कांद्याचे दर कमी असून निर्यात शुल्क वाढविल्यास स्थानिक बाजारपेठेत कांदा आवक वाढणार आहे. असे झाल्यास सद्या १८ ते २२ रूपये किलोने विकला जाणारा कांदा १० रूपयांच्या आत येवू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी शेतकर्यांबरोबर व्यापारी वर्ग करीत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram