Navi Mumbai : ट्रकचालकांच्या संपामुळे एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर वधारले
Continues below advertisement
केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रकचालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते. तसंच रात्री उशिरा हा संप मागे घेतला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मात्र आपला भाजीपाला नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात पाठवला नसल्याने आवक मोठ्या प्रमाणावर घसरलेय.कालही दीडशे ते दोनशे ट्रक आले नव्हते तर आजही तशीच परिस्थिती असून आवक घटल्याने दर २५ ते ३० टक्क्यांनी वधारलेत. दरम्यान भाज्यांच्या दरावर काय परिणाम झालाय पाहुयात.
Continues below advertisement