Vegetable Rate : नवी मुंबई बाजार समितीतील कालच्या बंदचा मुंबईकरांना फटका : ABP Majha
Continues below advertisement
राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि थंडीचा परिणाम होऊ लागल्याने भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. यामुळे दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातून एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. त्यातच आता थंडी पडू लागली असल्याने भाजीपाल्याच्या वाढीवर परिणाम होत आहे. मंगळवारी माथाडी कामगारांनी पुकारलेला संप अचानक माघार घेतला होता. पण संपामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला न पाठवल्याने काल बाजार समितीत भाजीपाला गाड्या कमी आल्या होत्या.
Continues below advertisement