Best Strike : सांताक्रुज डेपोत बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप, पोलिसांचा लाठीचार्ज
मुंबईतल्या सांताक्रुज डेपोत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक संप केल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याच पाहायला मिळालं. बोनस, पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. दरम्यान या आंदोलनावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.