Panvel to Sindhudurg : गणेशोत्सवासाठी पनवेल-सिंधुदुर्ग दरम्यान जड वाहनांना बंदी : ABP Majha

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल ते सिंधुदु्र्ग महामार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आलीय. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून २० सप्टेंबरला रात्री साडेअकरापर्यंत ही बंदी असेल. पनवेल ते सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणवकली, कुडाळ, सावंतवाडीदरम्यान ही बंदी असेल. त्यानंतर गौरी गणपती विसर्जन, परतीच्या प्रवासासाठी २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ पासून ते २५ सप्टेंबर रोजी रात्री ११पर्यंत तसेच अनंत चतुर्दशीसाठी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ पासून ते २९ सप्टेंबरच्या रात्री ८ पर्यंत जड वाहनांच्या  वाहतुकीवर बंदी राहील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola