नवी मुंबई APMC मार्केटमध्ये कोरोनाचे नियम पायदळी, माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा मास्कविना वावर
Continues below advertisement
नवी मुंबई शहरात गेल्या वेळी करोना उद्रेकाचं केंद्र ठरलेल्या एपीएमसी बाजारात सध्याही कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहे. एपीएमसी बाजारात दररोज ६०० ते ६५० गाड्यांची आवक होते. त्यामुळे दररोज शेकडो माथाडी कामगार, व्यापारी आणि कामगारांचा वावर असतो. मात्र, या सर्वांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन सुरुच असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं एपीएसमीमधील या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement