Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Amit Thackeray : नेरुळच्या शिवस्मारकाचं (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial) बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान नुकतेच अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र अमित ठाकरे यांनी येवेळी नोटीस स्वीकारली नाही. तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असे म्हणत अमित ठाकरेंनी हि नोटीस स्वीकारली नाही. दरम्यान, आज (रविवार) अमित ठाकरे हे स्वतः नेरुळ पोलीस स्थानकात स्वतः जाणार असल्याचे पुढे आले आहे. अमित ठाकरे हे स्वतः नेरुळ पोलीस स्थानकात जाऊन आता नोटीस स्वीकारणार आहे.
Amit Thackeray : नेरुळ पोलीस स्थानकातजाऊनआतानोटीसस्वीकारणार
दरम्यान, यावेळी अमित ठाकरें सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार या प्रमुख मनसेच्या नेत्यांसह मुंबईतील विभाग अध्यक्षही सोबत जाणार आहेत. यावेळी मनसेच शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार असल्याची चर्चा आहे. साडे अकरावाजेच्या दरम्यान अमित ठाकरे नवी मुंबईसाठी रवाना होणार आहेत. तर वाशी टोल नाक्यावर तासाभरात पोहचून तेथे नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहचून अभिवादन करतील. त्यानंतर रॅलीद्वारे नेरूळ पोलीस स्टेशनला पोहचणार आहेत.