300 Year Old Tree : मुंबईत विकासकामांसाठी 300 वर्ष जुन्या झाडाची कत्तल ABP Majha
मुंबईतील विकासकामांसाठी ३०० वर्षे जुन्या झाडाचा बळी गेलाय. सांताक्रूझ एसव्ही रोडवर गेल्या शेकडो वर्षांपासून उभं असलेलं गोरखचिंच जातीचं झाड तोडण्यात आलंय. जागतिक स्तरावर प्राचीन वृक्षांच्या यादीत असलेल्या या 'वर्ल्ड ट्री' ला जगवणं ही प्रशासनाची जबाबदारी होती. रस्त्याच्या मधोमध जरी हे झाड होतं तरी ते वाचवता आलं असतं असा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे.