WEB EXCLUSIVE | नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे जेव्हा ग्रीन ज्यूस बनवतात...
नाशिक पोलिस आयुक्तांच्या 'ग्रीन ज्यूस' रेसिपीची सध्या पोलिस वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय. जानेवारी महिन्यात कोरोनाची दूसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नाशिक शहरातील पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी हा अनोखा फंडा शोधून काढला आहे. पाडे यांनी स्वतः बेलपत्र, तुळस, कोथिम्बीर, पालक यांचे प्रत्येकी पाच ते दहा पाने, दोन आवळा तसेच मिठ यांचे मिक्सरमध्ये मिश्रण तयार करत ज्यूस तयार केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हा ज्यूस सेवन करण्यास सांगत एक व्हिडीओ तयार केलाय. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी जेवणाआधी एक तास हा ज्यूस प्राशन केल्यास सर्दी, खोकला न होता रोगप्रतिकारशक्ति वाढते असा सल्ला पाण्डेय यांनी दिलाय.